प्रतिष्ठा न्यूज

नांदेड शहरात भूकंपाचे सौम्य धक्के : नागरिक भयभीत- धक्क्याची तीव्रता नोंद 1.5 रिश्टर स्केल

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : – येथील महापालिका हद्दीत असलेल्या काही परिसरात आज दि.3 मार्च 2024 रोज रविवारी सायंकाळी ठिक 6:18 वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यावेळी घरे हादरल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले. धक्के सौम्य असल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डेटावरील आधारित प्राथमिक अहवालानुसार धक्क्याची तीव्रता नोंद 1.5 रिश्टर स्केल असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शहरातील शिवाजीनगर, पोलीस कॉलनी, आय टी आय परिसर, विवेकनगर, श्रीनगर, कैलासनगर, आदी भागात आज आवाजासह धक्के जाणवल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. यापूर्वीही शहरात अशा प्रकारचे धक्के जाणवले होते. यावेळी सायन्स कॉलेज परिसरात केंद्र बिंदू असल्याचे सांगण्यात आले. याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डेटावर उपलब्ध माहितीनुसार सदर धक्क्याची तीव्रता नोंद 1.5 रिश्टर स्केल इतकी असल्याचे माहिती देण्यात आली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.