प्रतिष्ठा न्यूज

संगीत नाट्यरंग व वैशाली सामंत लाईव्ह कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सांगली जिल्हा प्रशासन यांच्यावतीने कल्पद्रुम मैदान नेमिनाथनगर सांगली येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी सायंकाळी झालेल्या संगीत नाट्यरंग व वैशाली सामंत लाईव्ह या कार्यक्रमास प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रम प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, महानगरपालिका उपायुक्त राहूल रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वैशाली सामंत यांनी समृध्द महाराष्ट्र, मैं भारत हॅूं, ही गुलाबी हवा, दूरच्या रानात केळीच्या बनात, गवळण, अशा अनेक नव्या व जुन्या गाण्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. रसिकांनीही त्यांच्या गाण्यांना भरभरून प्रतिसाद दिला.

याचबरोबर या ठिकाणी सुरू असलेल्या प्रदर्शनी कलादालनास आज सांगलीकरांनी मोठ्या संख्येने भेट दिली. महिला बचत गटामार्फत लावण्यात आलेल्या खाद्य पदार्थांच्या स्टॉलला भेटी देवून नागरिकांनी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. कला दालनात शिवकालीन शस्त्र पाहण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.