आनंदी ज्युनिअर कॉलेजच्या जयवर्धन पाटील ला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ब्रांझपदक
प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज कळंबे तर्फे कळे या ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी जयवर्धन कृष्णात पाटील याने बारामती या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ८७ किलो वजनी गटात ब्रांझपदक पटकावले. त्याला संस्थेचे अध्यक्ष सतीश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई तसेच प्राचार्य सारिका पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.