प्रतिष्ठा न्यूज

एम.टी.ई.एस. इंग्लिश स्कुलमध्ये वार्षिक क्रिडा स्पर्धा उत्साहात सुरु…

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली:महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित एम.टी.ई.एस इंग्लिश स्कुलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरवात झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून, राष्ट्रीय क्रिकेटपटू, उत्कृष्ट गोलंदाज आणि यष्टीरक्षक  श्रावणी राजेंद्र देसाई या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे आगमन अश्वावर विराजमान होऊन फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या दिमाखात प्रशालेच्या क्रीडांगणावर झाले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रशालेच्या प्राचार्या सौ. इंदिरा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
        प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रशालेच्या सहशिक्षिका अलका पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात हनुमान मूर्ति पूजन,श्रीफळ वाढवुन व भूमी पूजनाने झाली. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करून ध्वजास मानवंदना दिली. प्रशालेच्या राष्ट्रीय जुदो खेळाडूंच्या हस्ते ज्योत फिरवण्यात आली. प्रशालेचा हेड बॉय सुहाण पठाण याने सर्व खेळाडूंना शपथ दिली. त्यानंतर, चारही संघाच्या खेळाडूंची रस्सीखेच, 100 मीटर धावणे या स्पर्धानी सुरुवात झाली. यामध्ये  विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्पर्धेचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या म्हणाल्या की, शाळेच्या अभ्यासाबरोबर, जीवनात खेळ सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. शाळेतूनच उत्कृष्ट खेळाडू तयार होतात. खेळाडूंकडे चिकाटी असणे खूप गरजेचे आहे. तरच ती खेळात यशस्वी होतात हा कानमंत्र ही, त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
       यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज (बाबा) देशमुख,  उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर व सचिव सुरेंद्र चौगुले यांनीही भरभरून शुभेच्छा दिल्या .  प्राचार्या इंदिरा पाटील, उपप्राचार्या  अंजना कोळी व इंग्लिश प्री-प्रायमरीच्या मुख्याध्यापिका  संपदा केळकर यांनीही सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या. या सर्व क्रीडा स्पर्धाचे आयोजन क्रीडा शिक्षक अतुल जाधव व संदीप पवार  यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा मसरगुप्पी यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.