प्रतिष्ठा न्यूज

केपीएस चेस अँकँडमीच्यावतीने 15 वर्षाखालील मुलांमुलीच्या स्वतंत्र निवड बुध्दिबळ स्पर्धेला सुरूवात

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली :  सांगली जिल्हा 15 वर्षाखालील मुलांमुलीच्या स्वतंत्र निवड बुध्दिबळ स्पर्धेचे उद्घाटन लक्ष्मीनारायण केटरर्सचे मा. सत्यजित सावंत व  सांगली जिल्हा बुध्दिबळ असो. चे सचिव  चंद्रकांत वळवडे यांच्याहस्ते पटावरील चाल खेळून करण्यात आले. यावेळी विक्रम हसबनीस , रविंद्र बिरजे उपस्थित होते. प्रास्ताविक, परिचय  श्री. विजयकुमार माने यांनी केले.  आभार सौ. पौर्णिमा उपळावीकर- माने  यांनी केले.
या स्पर्धेला सांगली जिल्हयातील सांगली, मिरज, इस्लामपूर, तासगांव, कामेरी  आदि शहरातील १५ वर्षाखालील मुलांच्या गटात १०७ मुले , २४ मुली खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये  हदीन महात, कश्यप खाकंरीया,आदित्य कोळी,  हर्ष शेट्टी , गुरूराज धोंगडे,अव्दिक फडके , गुरूराज धोंगडे या मानांकित खेळाडूसह शार्विल येडेकर, आदित्य चव्हाण,स्मित मोठे या नामांकिताचा सहभाग होता.नवव्या फेरीत प्रज्वल राय व कश्यप खाकरीया यांच्यातील डावात प्रज्वलने कश्यपचा ३८ व्या चालीला पराभव करून ८ गुणासह बुकलोझ गुणाच्या जोरावर विजेतेपद पटकाविले.मानांकित हदीन महात  व मानांकित आदित्य कोळी यांच्यातील डावात हदीनने आदित्यचा ३८ व्या चालीला पराभव करून हदीनने ८ गुणासह उपविजेतेपद पटकाविले.नवव्या फेरीअखेर  गुण  व विजेते – 1) प्रज्वल राय (सांगली )-८,  2) हदीन महात-८ 3) आदित्य चव्हाण – ७ 4) आदित्य कोळी-७ 5) गुरूराज धोंगडे -७ उत्कृष्ठ १३ वर्षाखालील – 1)शार्विंद कुंभार   , 2) प्रफुल्ल पाटील , 3) कपिल जहागिरदार, 4) केशव सारडा, 5) गुरूराज कुलकर्णी
  उत्कृष्ठ 11 वर्षाखालील – 1)स्वराज निकम , 2) शार्विल येडेकर , 3) हर्ष धनवडे ,
4) विश्व लोणी , 5) साईराज माने
उत्कृष्ठ ९ वर्षाखालील – 1) आशिष मोठे , 2) अव्दिक फडके , 3) कश्यप खाकरीया,
4) अवनित नांदणीकर , 5)  मंथन शहा
उत्कृष्ठ ७ वर्षाखालील – 1) अर्चित चौगुले, 2) आश्वत पंडित , 3) शौर्य नांगरे,
4) अव्दैत घोडके , 5) अंश घोडावत
 उदयोन्मुख  खेळाडू – 1) युगांधर झांबरे , 2) विरजीत दाईगडे
उत्कृष्ठ स्कूल – 1) सँथाम इंग्लिश स्कूल , 2) ए.बी.पाटील इंग्लिश स्कूल, 3) पोदार इंग्लिश स्कूल, 4) किड्स पॅराडाईज स्कूल, 5) अल्फोन्सो स्कूल , 6) झील इंटरनँशनल स्कूल, 7) इस्लामपूर हायस्कूल , 8) तक्षिला स्कूल , 9 ) केपीएसपी अँकँडमी
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ  सांगली जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष मा.
गिरीश चितळे व मा. रवि राय , सचिव  चंद्रकांत वळवडे यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी फिडे पंच पौर्णिमा उपळावीकर, प्रशिक्षक मा. विजयकुमार माने उपस्थित होते.
पाचव्या फेरीत स्नेहा निकम व जिया महात यांच्यातील डावात दोघेही 4 गुणासह आघाडीवर असल्याने कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला अर्ध्या गुणासह स्नेहाने 4.5 गुणासह बुकलोझ गुणाच्या जोरावर विजेतेपद पटकाविले तर जियाला 4.5 गुणासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आराध्या निबांळकर व स्वरा बावडेकर यांच्यातील डावात स्वराने आराध्याचा पराभव करून 4 गुणासह तिसरे स्थान पटकाविले.
 पाचव्या फेरीअखेर गुण व विजेते -1) स्नेहा निकम ( सांगली)- 4.5
2) जिया महात ( सांगली) -4.5
उत्कृष्ठ 13 वर्षाखालील – 1) स्वरा बावडेकर -4 ,
उत्कृष्ठ 11 वर्षाखालील – 1) शुभेच्छा खटावकर -3
उत्कृष्ठ 9 वर्षाखालील – 1) अनुजा कोळी ,  उत्कृष्ठ 7 वर्षाखालील – 1) अविरा फडके
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ डा. गणेश चौगुले  व मा. प्रशांत जाधव
यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी फिडे पंच पौर्णिमा उपळावीकर, प्रशिक्षक मा.
विजयकुमार माने उपस्थित होते.
या स्पर्धेचे पंच म्हणून –फिडे पंच पौर्णिमा उपळावीकर, सदानंद चोथे,रोहित पोळ,
विजयकुमार माने , दिपक वायचळ यांनी काम पाहिले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.