प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज स्कूलच्या सोनू सदानंद देवाडीगा हिला ज्युदो स्पर्धेत ब्रॉंज पदक

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : केंब्रिज स्कूल सीबीएसईच्या सोनू सदानंद देवाडीगा इ. ७ वी या विद्यार्थिनीने महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन, राष्ट्रीय निवड चाचणी धुळे 2022 अंतर्गत आयोजित 49 व्या महाराष्ट्र सब ज्युनिअर व कॅडेट ज्युदो स्पर्धेमध्ये सब ज्युनिअर स्टेट ज्युदो स्पर्धेत 40 किलोग्रम वजनी गटामध्ये ब्रॉंज पदक मिळवले. हे यश मिळविताना तिला क्रीडा शिक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील, कॅम्पस कोऑडीनेटर सतिश पाटील, मुख्याध्यापिका ख्रिस्टीना मार्टीन यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.