प्रतिष्ठा न्यूज

क्रिकेट स्पर्धेत पंढरपूर सिंहगडचा काॅलेज संघ विजयी

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यावतीने करमाळा येथे आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर च्या संघाने दणदणीत विजय मिळवून यश संपादन केले अहल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन किक्रेट स्पर्धा करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व जीन मैदान येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. सोमवार दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी या स्पर्धा सुरु झाल्या होत्या. यामध्ये पहिल्याच दिवशी खेळाडूंनी दमदार फटकेबाजी केली आहे. यामध्ये पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील अभिजित येडगे या विद्यार्थ्यांने तब्ब्ल ९८ धावा करण्याचा पहिल्याच दिवशी विक्रम केला तर विनायक मुनाळे यांनी ५३ धावा केल्या. जीन मैदान व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर हे सामने संपन्न झाले.
या क्रिकेट स्पर्धा १४ जानेवारी २०२३ पर्यंत चालणार आहेत. या स्पर्धेत सोलापूर विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये सहभागी झालेली आहेत. स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्या संघास फिरता “राजे जन्मजेय भोसले” चषक दिला जाणार आहे.
पहिल्या क्रिकेट सामना हा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. हा सामना मंद्रूप एसबीपी महाविद्यालय विरुद्ध पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्यात सामना झाला. यामध्ये पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाचा संघ विजयी झाला.
हा सामना यशस्वी करण्यासाठी प्रा. शिवाजी पवार यांनी परिश्रम घेतले असुन यशस्वी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या क्रिकेट संघाचे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.