प्रतिष्ठा न्यूज

चला इतिहास जागवुयात : तासगावात मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेकडून भव्य किल्ला स्पर्धा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:छत्रपतींचा प्रेरणादायी इतिहास आठवूया चला किल्ले बनवूया!!मंगलमूर्ती सेवाभावी संस्था तासगाव यांच्यावतीने या वर्षी दीपावलीच्या सुट्टी मध्ये लहान मावळ्यांसाठी,आणि आपला छत्रपतींचा इतिहास जागवणेसाठी भव्य गडकिल्ला स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
गडकिल्ला परीक्षण कालावधी
23/10/2022 ते 26/10/2022
बक्षीस वितरण रविवार 30/10/2022
*स्पर्धेचे नियम-*
स्पर्धकांनी नाव नोंदवणे आवश्यक आहे,प्रवेश विनामूल्य आहे,गटाने किल्ला आपापल्या जागीच करायचा आहे,बनवलेला गडकिल्ला हा मूळ गडकिल्याची प्रतिकृती असावा,
मूळ गडकिल्याची माहिती स्पर्धेकाला असावी,नावीन्य,कल्पकता,पर्यावरण पूरक सुबक किल्ला असावा,गडकिल्ला प्रतिकृती बनवणारा स्पर्धक गडकिल्ला पाहणी वेळी हजर असलाच पाहिजे.
नावनोंदणीसाठी संपर्क:मंगलमूर्ती ज्युस,श्री गजानन भांडी फर्निचर.
किल्लेस्पर्धा 2022 बक्षीस खालील प्रमाणे…
1 ले बक्षीस  2000 रु
मा.विनायक निकम,तासगाव
2 रे बक्षीस 1500 रु
ओम साई टूर्स & ट्रॅव्हल्स तासगाव,मा.चिवटे व खेराडकर  साहेब
3 रे बक्षीस 1200 रु
मंगलमूर्ती ज्युस व भेळ सेंटर,गणपती मंदिर समोर तासगाव,
मा.सुधीर रसाळ,साहेब तासगाव
4 थे बक्षीस 900 रु
वरद पेंट्स & हार्डवेअर,जिजाऊ चौक,वरचे गल्ली,तासगाव
मा.अवधूत साळुंखे साहेब
5 वे बक्षीस 700 रु
आर्वी पॅकेजिंग,तासगाव
मा.विवेक पैलवान साहेब
10 उत्तेजनार्थ बक्षिसे
मा.गिरीश चौधरी, तासगाव
मा.शिवाजी करमळकर,तासगाव
मा.डॉ.प्रकाश तुपे,तासगाव
मा.चंदू भाऊ मिरजकर,तासगाव
मा.शिवाजी गायकवाड सर, वासुंबे
मा.स्वप्नील नांदे,साहेब …
तरी स्पर्धकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी आणि स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन मंगलमूर्ती सेवाभावी संस्था तासगाव यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.