प्रतिष्ठा न्यूज

न्यू इंग्लिश स्कूल, बेडगची कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : जिल्हा तालीम संघ, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, दिग्विजय कुस्ती केंद्र बेडग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा सिद्धेश्वर मंगल कार्यालय बेडग या ठिकाणी संपन्न झाल्या.
यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल,बेडग या विद्यालयाने व्दितीय क्रमांकाच्या विजेतेपदाचा चषक पटकावला.
स्पर्धेचा निकाल असा –
१) सुरज संदीप साळुंखे-६०किलो वजनी गटात प्रथम
२) प्रशांत अशोक माळी-४८ किलो वजनी गटात प्रथम
३) मानसी मल्हारी खरमाटे-४६ किलो वजनी गटात प्रथम
४) अमृता महादेव भोसले-३९ किलो वजनी गटात द्वितीय
५) राजवर्धन रावसाहेब खरात-४५किलो वजनी गटात द्वितीय
यशस्वी विद्यार्थ्यांची मिरज येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक उत्तमराव पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. बेडग येथील दिग्विजय कुस्ती केंद्राचे विश्वस्त भिमराव शिंदे,जिल्हा तालीम संघाचे तांत्रिक सचिव हणमंतराव जाधव ,कुस्ती निवेदक ज्योतिराम वाजे,विष्णू माळी,जिल्हा क्रीडा कार्यालयाचे सावंत, युवराज पाटील, क्रीडा शिक्षक पूजा पाटील, रजनी राज्यपाल बेताल यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.या स्पर्धा १४,१७,१९ वर्षांखालील फ्री स्टाईल व ग्रीकोरोमन स्टाईल वजन गटात झाल्या.
भिमराव शिंदे,सचिन शिंदे ,नितीन शिंदे, सचिन मुळे यांच्यासह दिग्विजय कुस्ती केंद्रातील मल्लांनी विशेष परिश्रम घेतले. पृथ्वीराज रसाळ, ज्ञानेश्वर पवार, प्रतीक पाटील, विशाल शिंदे सौरभ शिंदे, शशिकांत कुंभार यांनी पंच म्हणून काम पाहिले. शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले “एन.आय. एस.” कुस्ती प्रशिक्षक सुहास पाटील, दीपक पाटील, क्रीडा शिक्षक अमोल पाटील ,अमित हिंगणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक श्रीनिवास पाटील, पर्यवेक्षिका उज्वला ढेरे, क्रीडा विभाग प्रमुख श्वेता पाटील यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतरे कर्मचारी,विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.