प्रतिष्ठा न्यूज

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डस 2023 करिता सांगलीच्या “खिडकी” या लघुपटाची निवड

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डस 2023 करिता सांगलीच्या “खिडकी” या लघुपटाची निवड.
एका गरीब मुस्लिम कुटुंबातील मुलीच्या शिक्षणावर या लघुपटात महत्वपूर्ण भाष्य केलेलं आहे. याची निर्मिती उमेश ढोकने आणि सुजाता मेंगाने यांनी केली असून दिग्दर्शन अमित काटकर यांचे तर लेखन राजू नदाफ यांचे आहे. या लघुपटाचे चित्रीकरण सांगली आणि मिरज परिसरात झाले असून सिनेमॅटोग्राफर वीरधवल पाटील यांचे सुंदर छायाचित्रण या लघुपटास लाभले आहे. एडिटिंग ची धुरा गोरक्षनाथ खांडे आणि सृजना ढाके यांनी यशस्वी रित्या सांभाळली आहे. लोकेशन साऊंड रेकॉर्डिंग मनोज काथे यांनी केलं असून साऊंड डिझाईन राष्ट्रीय पुरस्कार विजेते महावीर सबन्नावर यांनी केलेलं आहे. कथेला न्याय देणारं पार्श्वसंगीत अग्नेल रोमन यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. आर्ट डायरेक्टर ऍड दीपक कांबळे यांनी तर प्री प्रोड्युक्शन चे काम राजू नदाफ, माणिक वडियर आणि सूरज नागावकर यांनी पाहिले असून प्रोड्युक्शनचे कामकाज विनायक बुटाले, शेखर देशपांडे, आकाश शिंदे, निखिल खोत, आमोद ऐनापुरे, अविनाश भोरे, अमित तूपलोंढे यांनी पाहिलेलं आहे. या लघुपटात प्रमुख भूमिकेत रुजवी ढोकने , तबरेज खान, ऍड जुलेखा मुतवल्ली, ऍड पल्लवी कांते, प्रा. आखलाख ताडे, डॉ.अनुष्का पाटील आणि विशाल दौंडे हे आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.