प्रतिष्ठा न्यूज

कर्तृत्ववान व्यक्तींचा चांगूलपणा समाजा समोर आला पाहिजे : इंद्रजित देशमुख ; ६ वे प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळा तासगाव येथे उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : कर्तृत्ववान व्यक्तींचा चांगूलपणा समाजासमोर आला तर समाजाला चांगली दिशा मिळू शकते. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख यांनी केले. प्रतिष्ठा फौंडेशन आयोजित ६ व्या प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनात ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. संमेलन तासगाव येथील समृध्दी मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडले.
स्वागताध्यक्ष तासगाचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, कृष्णा कालवा उपविभाग, कराड उपअभियंता लालासाहेब मोरे यांच्याहस्ते रोपाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक भिमराव धुळूबुळू कविसंमेलाचे अध्यक्ष होते. मिरज शासकीय दूध प्रकल्पाचे सेवानिवृत्त अधिकारी सुहास सुर्यवंशी, मुख्याध्यापक हरीराम खबाले प्रमुख उपस्थित होते. संमेलनाचे निमंत्रक तानाजीराजे जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जी. के. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. किशोर पाटील व सुनिता निकम पाटील यांनी सुत्रसंचालन केले.
इंद्रजित देशमुख म्हणाले, अपरिहार्य कारणामुळे मला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. परंतु संमेलनात चांगल्या लोकांना पुरस्कार आणि साहित्यिकांचा विचार सर्वत्र पोहचविण्याच्या उदात्त हेतून हा हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. खरं तर समाजातली चांगली लोक समोर येणं आणि चांगल्यातल्या चांगूलपणा समोर येणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. सध्यचा भवताल आपण पाहिला तर हिंसा, घृणा, द्वेष याची परिसिमा होऊ पाहते आहे. त्याला चांगल्या पध्दतीने उत्तर द्यायचे असेल तर जिथं चांगूपणा शिल्लक आहे. जिथं उदात्तता शिल्लक आहे. जिथं समाजातील प्रेम आणि त्याच्या ठायी असणारी कृतिशीलता आहे, अशा लोकांना समोर आणून त्यांचा आदरपुर्वक सन्मान करणे ही गोष्ट खूपच आवश्यक गोष्ट आहे. साहित्यिक समाजातली वास्तवता मांडता, समाज एकरूप राहावा, एकसंघ राहावा यासाठी धडपडता. ते आपल्या शब्दांच्या आणि वाणीच्या माध्यमातून समाज घडवत असतात.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, तासगावमध्ये साहित्य परंपरा जपण्याचे कार्य प्रतिषं फौंडेशन करत आहे. माणसाला जगण्याचं सामर्थ साहित्यातून मिळत असते. माणसाने कसं जगावं हे साहित्यिक सांगतात. म्हणून साहित्यिकच समाजाचा आरसा असतात.
उद्घाटक लालासाहेब मोरे म्हणाले, प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव यांनी प्रतिष्ठा फांऊडेशनच्या माध्यमातून सुरू केलेली ही प्रबोधनाची परंपरा अखंड राहिली पाहिजे.
प्रमुख उपस्थितीत सुहास सुर्यवंशी म्हणाले, माणसाने नेहमी इतरांना सहकार्य करण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. त्यातच आपले आणि समाजाचे हित असते.
ज्येष्ठ साहित्यिक भिमराव धुळूबुळू यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन उत्साहात पार पडले. यामध्ये गझलकार सुधीर इनामदार, नामदेव भोसले, श्लेषा कारंडे, सुनिता निकम, धनदत्त बोरगावे, प्रा. आबासाहेब पाटील, मोहन आवटी, शाहीर चंद्रकांत गायकवाड, प्रा. जी. के. पाटील, अमृता निकम यांच्यासह उपस्थित कविंनी कवितांचे सादरीकरण केले. दत्ता संकपाळ यांनी आभार मानले. संयोजन सचिव विद्या जाधव यांनी केले.
संमेलनाच्या उद्घाटन समारंभात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या राज्यभरातील मान्यवरांना प्रतिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.