प्रतिष्ठा न्यूज

कुपवाड मध्ये महापौर चषक राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धांना प्रारंभ, राज्यभरातून 34 संघ दाखल, 500 खेळाडू सहभागी: 4 जून पर्यंत रंगणार कब्बडीचा थरार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयोजित आणि सांगली जिल्हा व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने निमंत्रित पुरुष व महिला गट महापौर चषक राज्यस्तरीय पुरुष महिला कबड्डी स्पर्धेचा आजपासून सुरुवात झाली. कुपवाड येथील नवमहाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगनावर या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. स्पर्धेचे उद्घाटन राज्य कब्बडी असोशियनचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या हस्ते आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी तसेच महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या उद्घाटन सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त संजीव ओव्होळ, उपायुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त स्मृती पाटील,राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज , सांगली जिल्हा कब्बडी असोशियनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, राष्ट्रीय कब्बडीपटू गणेश अण्णा शेट्टी, अर्जुन पुरस्कार प्राप्त एअर इंडियाचे अधिकारी श्रीराम भावसार, राज्य जनरल सेक्रेटरी बाबुराव चांदोरे स्थानिक नगरसेवक विष्णु माने, मनगु सरगर, संतोष पाटील, राजेंद्र कुंभार, विजय घाडगे , आरोग्याधिकारी डॉ वैभव पाटील, अग्निशमन अधिकारी विजय पवार, अभियंता वैभव वाघमारे, धनजय हर्षद, कर अधीक्षक वाहिद मुल्ला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे संयोजन सहायक आयुक्त नितीन शिंदे आणि मनपाचे क्रीडाधिकारी महेश पाटील, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते , काका हलवाई यांनी केले तर स्पर्धेचे समालोचन सुहास व्हटकर यानी केले. उद्घाटनानंतर
पुरुष गटात तरुण मराठा सांगलीवाडी विरुद्ध जयहिंद इचलकरंजी , निर्मल औरंगाबाद विरुद्ध
राकेशभाऊ घुले पुणे, गुड मॉर्निंग मुंबई विरुद्ध जी एम अहमदनगर, स्वस्तिक मुंबई, विरुद्ध शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा या संघात चुरशीचे सामने सुरू झाले
तर महिला गटात एम डी पुणे विरुद्ध शिवशक्ती सांगली, कर्नाळा पनवेल विरुद्ध डायनॅमिक इचलकरंजी, मातोश्री कोकरुड विरुद्ध तरुण भारत सांगली आणि शिवाजी उदय सातारा विरुद्ध महात्मा गांधी मुंबई यांच्यात चुरशीने सामने सुरू झाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.