प्रतिष्ठा न्यूज

परमोरी शाळेत महात्मा फुलेंना अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज /जावेद पिंजारी
वणी दि 28 : जि. प. प्रा. शाळा परमोरी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी मुळे अभिवादन करण्यात आले.

शालेय व्यवस्थापन समिती परमोरीचे अध्यक्ष गणेश गांगोडे, शिक्षण समितीचे शिक्षण तज्ज्ञ केशव शिवले, सदस्य महेश शिवले व शिक्षक वृंद यांनी महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले.

नौशाद यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्या विषयी उपस्थितांना माहिती दिली. सावित्रीबाई यांना शिकवून मुलींची पहिली शाळा सुरु केल्यानंतर महात्मा जोतिबा फुलेंना व क्रांतिज्योती सावित्री बाई फुलेंना अनेक रोषाचा सामना करावा
लागला.

शालेय व्यवस्थापन समितीतील शिक्षण तज्ञ केशव भाऊ शिवले यांनी महात्मा फुले यांनी लिहलेल्या साहित्याची माहिती दिली.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनाविषयी मनोगत व्यक्त केले.
भारती ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नौशाद यांनी केले.
यावेळी सुनीता विसपुते, योगिता जगताप, मंदा शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.