प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या प्रभाग क्र.दोन मधील मळेभागाकडे जाणारा ओढा पात्रातील पूल कधी होणार नागरिकांचा सवाल? प्रशासनाचे दुर्लक्ष…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगावचा पूर्वभाग प्रभाग क्रमांक दोन मधील मळेभागाकडे जाणारा ओढ्या वरील पुल परतीच्या मोठ्या पावसात पाणी आल्यामुळे वाहून गेला आहे.गेली तीन महिने हा रस्ता बंद आहे.दरेकर मळा,अष्टेकर मळा,मानकर मळा,माईनकर मळा, इंदिरानगर झोपडपट्टी वस्तीतील लोकांना गावातून जाण्यासाठी सर्वात जवळचा असणारा हा मार्ग बंद असल्यामुळे लोकांना 200 मीटर अंतरासाठी साडेतीन किलोमीटर अंतर लांबून ये जा करावी लागत आहे.येथील राहणारे सर्व लोक कष्टकरी व आर्थिक विवंचनेतील लोक आहेत.येथील लोकांची जेवढ़ी कमाई आहे त्याच्या निम्मा खर्च रोज जाने येनेसाठी रिक्षा प्रवासा साठी होत आहे.या वाहून गेलेल्या पुलावरुंनच 15 ते 20 दिवसा पूर्वी एक व्यक्ति वाहून गेल्यामुले त्या व्यक्तिचा मृत्यु झाला आहे.
वृद्ध,शाळेचे विध्यार्थी,कामगार इतर सर्वच नागरिकांची याच पुलावर भिस्त आहे.हा पुलच वाहून गेल्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत.ही समस्या बऱ्याच वर्षा पासून आहे,तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करून कायम स्वरूपी ठोस उपाय म्हणून एक कॉन्क्रिट पूल तयार करून येथील लोकांचा कायम स्वरूपी प्रश्न मिटवावा अशी मागनी नागरिक करू लागले आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.