प्रतिष्ठा न्यूज

गोरगरिबांचा विकास महत्त्वाचा : आप्पा पडवळ

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : डॉ. डी वाय पाटील साखर कारखाना च्या तज्ञ संचालकपदी पांडुरंग उर्फ आप्पा पडवळ यांची नुकतीच नियुक्ती झाली. सांगशी येथील पडवळ घराण्याच्या वतीने यशवंतराव पडवळ पडवळ यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आप्पा पडवळ म्हणाले, ” डॉ. डी वाय पाटील साखर कारखाना आमचे नेते मा.बंटी पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली असून तालुक्यातील गोरगरीब शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानून यशस्वी वाटचाल करत आहे.चालू हंगामात कारखान्याने पहिली उचल तीन हजार प्रती टनास देण्याची घोषणा करून यावर्षीच्या ऊसदराची कोंडी फोडली आहे. ”
यावेळी पत्रकार तुकाराम पडवळ शिवसेनेचे विलास पडवळ सुनील पडवळ यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज पडवळ, सुनील पडवळ यांनी परिश्रम घेतले.
यावेळी तुकाराम पडवळ,जयसिंग पडवळ, मनोज पडवळ, अशोक पडवळ, प्रदीप पडवळ, सुजित पडवळ, उदय पडवळ, सुनील पडवळ, अनिल पडवळ, भगवान पडवळ,सुहास पडवळ, विशाल पडवळ, दीपक कदम, संजय कांबळे, अशोक वरेकर आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.