प्रतिष्ठा न्यूज

आमच्या भागातल्या गाईचे दुध काळे आहे काय? शिवसेनेचे संजय चव्हाण यांचा सवाल; दुध संस्था करतायेत शेतकऱ्यांची लूट; जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सांगली जिल्ह्यातील अनेक दूध संघ चालकां कडून गाईच्या दुधाचा दर पाडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असून,शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात गायीच्या दुधाला एक दर आणि सांगली जिल्ह्यात दुधाचा एक दर कसा असू शकतो, असा सवाल करीत संबंधितांवर कठोर कारवाई करा,अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे तासगाव तालुका प्रमुख संजय चव्हाण यांनी दिला आहे.यासंबंधी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना त्यांनी निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की,गेली आठ नऊ महिने गाईच्या दूध दर सातत्याने कमी होत गेले आहेत.आजअखेर तो काही ठिकाणी २७ रुपये विशेषतः सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात दर कमी होताना दिसत आहे.एकीकडे खाद्याचे वाढलेले दर आणि दुष्काळग्रस्त भागात चारा उपलब्ध नसलेने बाहेरून ४००० ते ५००० रूपये प्रतिटन या दराने चारा आणावा लागत आहे. काही दूध उत्पादक संघ खाजगी प्रकल्प यांनी गाईच्या दुधाचा दर पाडून शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.सरासरी गाईचे एक लिटर दूध उत्पादन करण्यासाठी ४० ते ४२ रुपये खर्च होत असताना दुसरीकडे अतिरिक्त दुधाचा कांगावा करून काहींनी जाणूनबुजून दर पाडले आहेत.तर दुसरीकडे जवळच्याच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्रास सहकार,गोकुळ,वारणा,सांगली जिल्ह्यातील राजारामबापू दूध संघानी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन चांगले दर दिले आहे.
त्या भागातील दूध उत्पादनाचे दूध हे पांढरे आणि आमच्या गाईचे काळे आहे का ? जनावरे कशी जगवायची हा गंभीर प्रश्न सांगली पुर्वभागातील विशेषतः तासगाव तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील संघाप्रमाणे आणि राजारामबापू संघानूसार जिल्ह्यातील तासगाव पूर्व भागातील दूध उत्पादकांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून दर मिळवून द्यावा,अशी मागणी शिवसेनेचे संजय चव्हाण व शेतकऱ्यांनी केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.