प्रतिष्ठा न्यूज

मुख्याध्यापक- एस.आर. मुंगल यांचा शाळेच्या वतीने सेवापूर्ती निरोप समारंभ संपन्न

प्रतिष्ठा न्यूज /वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ संचालित- किसान विद्यालयाचे मुख्याध्यापक- एस.आर. मुंगल हे नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्यामुळे संस्थेच्या वतीने त्यांच्या सेवापूर्ती निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल प्रशंसा करण्यात आली व त्यांचे भावी आयुष्य सुख समृद्धीचे जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव- मा.स्वप्नील पाटील उमरेकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून- मारतळा येथील साईबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक- एकनाथ मोरे, केंद्रप्रमुख- बाबुराव कापसे, माजी सभापती- सतीश पाटील उमरेकर,  जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक- श्रीनिवास आमनवाड, वाघमारे सर, किसान प्रा.कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका- मुजीबुनिसा शेख, मुख्याध्यापक- एम. डी.सिरसाट, अशोकराव पाटील, भानुदास पाटील, तेजेराव पाटील, सुभाषराव सिरसाट, नागोराव माली पाटील, माधवराव सिरसाट, गोविंद मुंगल, नागोराव सिरसाट, अरविंद सिरसाट आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी: शारदा सरस्वती व हरित क्रांतीचे प्रणेते मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्याच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळेतील शिक्षक- पदमवार, शिंदे, कदम, सिरसाट, पाटील, बच्चेवार, पालदेवार, पाटोदेकर, रायकवाड, जाधव, मुगटकर, मेथे, चव्हाण मॅडम, मुलुकवार, तसेच- दारुवाले, पवळे, मोमीन, यलगंधलवार, शेख, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अवलिया शिक्षक- रामचंद्र शिंदे यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्काऊड गाईड शिक्षक- माधव बच्चेवार यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.