जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमणी शाखेने नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी; ग्रामपंचायतीची मागणी
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निमणी शाखेमध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या नुकसान भरपाई मदतीच्या रक्कमा अनामत खात्यावर जमा असून सदरच्या रक्कमा कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या आहेत याची यादी मिळावी,असा ठराव निमणी ग्रामपंचायतीने नुकताच केला असून यादी मिळणे संदर्भात शाखेकडे पत्रव्यवहार केला आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळवून देण्यासाठी आता ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून आजही सुमारे १७ लाख रुपये इतकी रक्कम बँकेच्या अनामत खात्यावर पडून आहे.