प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाली पहिली कार्डीयाक अँब्युलन्स

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या ताफ्यात पहिली कार्डीयाक रुग्णवाहिका दाखल झाली आहे. आज मा शुभम गुप्ता यांनी कार्डीयाक अँब्युलन्सची महापालिका आवारात पाहणी केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती ना. नीलम गोऱ्हे यांच्या निधीतून ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे. उद्या मा. मुख्यमंत्री आणि मा. उपसभापती यांच्याहस्ते विधान भवनामध्ये होणार या रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे.

सदरची रुग्णवाहिका ही महापालिकेकडून गीतांजली सेवाभावी संस्थेला देण्यात येणार असून त्या संस्थेकडून रुग्णवाहिका चालविली आणि सेवा दिली जाणार आहे. यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुनीता मोरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती ना. नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाठपुरावा करून सदरची रुग्णवाहिका मंजूर करून घेतली होती. या रुग्णवाहिकेची किंमत 45 लक्ष इतकी असून सदरची रुग्णवाहिका ही पूर्णपणे वातानुकूलित आहे. या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सोय असून रुग्णांना शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कानुसार दर आकारणी केली जाणार आहे. आज महापालिकेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी या रुग्णवाहिकेची पाहणी करीत कंपनीकडून रुग्णवाहिका महापालिकेच्या ताब्यात घेतली. यावेळी शिवसेना नेत्या सुनीता मोरे, राहुल मोरे, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील, जलनिस्सरन अभियंता चिदानंद कुरणे, कार्यशाळा प्रमुख तेजस शहा, विनायक जाधव , वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका तोडकर आदी उपस्थित होते. सदर रुग्णवाहिका महापालिकेकडून रीतसर करारपत्र करीत गीतांजली सेवाभावी संस्थेच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.