प्रतिष्ठा न्यूज

निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने सज्ज राहावे – जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 18 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी सांगली जिल्ह्यामध्ये दि. 7 मे रोजी मतदान होत आहे. ही निवडणूक मुक्त निर्भय व शांततामय वातावरणात पार पडण्यासाठी तसेच निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कायदा व सुव्यवस्था बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे, मनपा आयुक्त सुनील पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन आदी उपस्थित होते.

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागांना आवश्यक ते मनुष्यबळ देण्यात येईल. येत्या 28 मार्चपर्यंत चॅप्टर केसेसबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी झिरो पेंडन्सी करावी तसेच याबाबतचा पुढील आढावा दहा दिवसांनी घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तर निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी दिली.

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान व मतदानानंतर किती पोलीस बंदोबस्त आवश्यक आहे, याबाबतचे सादरीकरण पोलीस विभागाकडून करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुकानिहाय विस्तृत आढावा घेतला त्याचबरोबर एस.एस. टी. / एफ. एस. टी ./व्ही. एस. टी. आणि व्ही. व्ही. टी. पथकांचाही आढावा घेतला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांच्यासह संबंधित तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, आरटीओ आणि होमगार्ड विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणेचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.