प्रतिष्ठा न्यूज

रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी जगन्नाथ ठोकळे : राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांची सांगली येथे घोषणा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली(प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, पॅंथर पासून रिपब्लिकन पक्षांमध्ये कार्यरत असणारे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या सरचिटणीस पदी निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत केली.

जगन्नाथ ठोकळे हे गेली 35 ते 40 वर्ष रिपब्लिकन पक्षांमध्ये कार्यरत असून यापूर्वी त्यांनी सांगली जिल्हा अध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र सचिव या पदावर काम केले आहे. यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, वेळ कांबळे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती तसेच माझे जन्म जिल्हा असलेल्या सांगली जिल्ह्यातील अभ्यासून आहे त्याला राज्य कार्यकारणीवर काम करण्याची संधी देणे गरजेचे असल्याने एक अभ्यासू व प्रामाणिक नेतृत्व म्हणून जगन्नाथ ठोकळे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर सरचिटणीस या पदावर निवड करीत असल्याचे जाहीर केले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे,राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, परशुराम वाडेकर,सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात,युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ आठवले,जिल्हा उपाध्यक्ष मनोज गाडे, सांगली शहराध्यक्ष बापू सोनवणे,बापूसाहेब सोनवणे, शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.