प्रतिष्ठा न्यूज

चोरीस गेलेल्या दोन सायकली शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पथकांनी शोधून केली चांगली कामगिरी

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : मारतळा येथील साईबाबा हायस्कूल मधून 2 दिवसापूर्वी चोरीस गेलेल्या 2 विद्यार्थ्यांच्या 2 सायकलचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या शोध मोहिमेस अखेर यश आले असून 2 दिवसाच्या आतच विद्यार्थ्यांना गावचे उपसरपंच भास्कर पाटील ढगे, मुख्याध्यापक एकनाथ मोरे यांच्या हस्ते दि 3 डिसेंबर 2022 रोज शनिवारी त्या सायकली सुपूर्त करण्यात
आल्या.यावेळी शोध घेणाऱ्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक मोरे यांनी केले.या सायकली शाळेच्या प्रांगणातून दोन दिवसापूर्वी चोरिस गेल्या होत्या.
या सायकली चोरीचा शोध घेण्यासाठी शाळा स्तरावर 1 शिक्षक व 10 विद्यार्थी असा ग्रुप करून परिसरातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गावातच पाठविले होते. अखेर 2 दिवसाच्या आतच शोध मोहिमे यशस्वी झाली. विद्यार्थ्यांनी काकांडी शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात दोन सायकली सोडून कोणीतरी पसार झाल्याचे सांगितले आणि तेथे दोन्ही सायकली सापडल्या असुन कु.अनुसया येडे व गणेश भरकडे यांना या सायकली देण्यात आल्या. यावेळी उपसरपंच- भास्कर पाटील, मुख्याध्यापक एकनाथ मोरे,व शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.