प्रतिष्ठा न्यूज

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त- मारतळा जि.प. शाळेस तहसीलदार मुंढे यांनी भेट देऊन केला दिव्यांगाचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील मारतळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांनी दि 3 डिसेंबर 2022 रोज शनिवारी भेट दिली व दिव्यांग तरुण अमोल दर्शने यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी मुंढे यांनी नवीन मतदान नोंदणी कक्षास भेट देऊन वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नव युवकांसाठी निवडणूक आयोगा तर्फे दोन दिवसीय विशेष मतदार नोंदणी मोहिमेबद्दल मार्गदर्शन करत, दिव्यांग मतदार नोंदणी करण्याचे सांगितले.
यावेळी नायब तहसीलदार- मोकले, तलाठी- मनोज जाधव, केंद्र प्रमुख-टी.पी.पाटील, मुख्याध्यापक- व्यंकट मुगावे, बीएसओ- बालाजी प्यारलावार, अमृतवार, मारोती बस्वदे, संजय भरकडे, दत्तराम ढेपे, अमोल दर्शने आदींसह शिक्षक व नागरिकांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.