प्रतिष्ठा न्यूज

सावळज येथे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज : सावळज येथे श्री संत बाळूमामा देवालय श्री क्षेत्र आदमापूर यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत बाळूमामा देवस्थान सावळज यांच्या वतीने वार्षिक भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रामुख्याने श्री क्षेत्र आदमापूर देवस्थान येथील प्रमुख भाकणूककार मा.श्री कृष्णात डोने महाराज यांची उपस्थिती लाभली होती यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महाराजांचे आशिर्वाद घेतले,
या भंडारा कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने पहाटे 5 : 30 ते 6 : 30 वाजता महाभिषेक सोहळा, सकाळी व रात्री 9 वाजता महाआरती, त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये श्री संत बाळू मामा यांच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच 11 ते 4 वाजेपर्यंत ओव्यांचा कार्यक्रम, सायंकाळी 6 : 30 ते 8 : 30 पर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम,असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन या वेळी करण्यात आले होते या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यामध्ये स्व. आर आर आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील उपस्थित होते.
तसेच श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान सावळजचे संयोजक सागर पाटोळे, मा. उपसरपंच संजय (तात्या) थोरात, दिलीप आणुसे,किशोर मोहिते,मंगेश बुधवले,आदी भक्त भाविकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी हजारो भक्त भाविकांनी दर्शन घेऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.