प्रतिष्ठा न्यूज

सशस्त्र हल्ल्यात गोरक्षक ठार तर पाच जण गंभीर जखमी नांदेड जिल्ह्यातील घटना : ईस्लापूर, शिवणी बाजारपेठ कडकडीत बंद

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : दि.19 जून 2023 रात्रीच्या 11 वाजेच्या सुमारास मलकजांब तांडा येथील पुला जवळ एक बोलेरो पिकअप गाडी संशयास्पद आढळल्याने सदरील गाडीची गोरक्षक कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता गाडीतील काही अज्ञातानी गोरक्षक कार्यकर्त्यावर हल्ला केला असून या हल्ल्यात चिखली येथील गोरक्षक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. असून या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ ईस्लापूर, शिवणी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले असुन शिवणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी काही काळ आंदोलन केले आहे.
या प्रकरणातील आरोपीच्या शोधात पोलीस पथक तेलंगाणा राज्यात रवाना झाले असून जिल्हा पोलीस अधीक्षकासह पोलीस यंत्रणा शिवणी परिसरामध्ये तळ ठोकून आहेत.
दि.19 जून रोज सोमवारी रात्री 11 वाजता शिवणी येथील गोरक्षक कार्यकर्ते महेश कोडलवार, ज्ञानेश्वर कारलेवाड, बालाजी राहुलवाड, विठ्ठल अनंतवार, विशाल मेंडेवार, बालाजी कारलेवाड, शेखर रापेली हे कार्यकर्ते शिवणी येथील धनंजय तृप्तेवार याची इरटीका गाडी क्रमांक 8469 ही गाडी भाड्याने घेऊन ग्राम सातारा मंडळ कुंटाला, जिल्हा निर्मल तेलंगाणा राज्य येथे घरगुती कार्यक्रमा करिता गेले होते. घरगुती कार्यक्रम आटोपून रात्रीच्या वेळी परत येत असताना मलकजांब तांडा येथील पुलाजवळ बोलेरो पिकअप गाडी संशयास्पद आढळल्याने सदरील गाडीची बाजूला थांबून चौकशी करत असतांना या गाडीतून 10 ते 12 जणांनी खाली उतरून लाट्या, काट्या व चाकूने या गोरक्षक कार्यकर्त्यावर हल्ला सुरू केला.
या हल्ल्यात शेखर रापेल्ली यांच्या छातीत तिक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
असून उर्वरित 5 गोरक्षक कार्यकर्त्यांना लाट्या, काट्याने जबर मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
या प्रकरणी सोपान पेंटवार यानी दिलेल्या फिर्यादी वरून 10 ते 12 जणा विरुद्ध इस्लापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने ईस्लापूर, शिवणी भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील या घटनेची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सर्व नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेने शिवणी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक- शशिकांत मावळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक- श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस अधीक्षक- गौहर हसन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक- डॉ.धरणे, उपविभागीय अधिकारी- नेहा भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी- विजय डोंगरे, तहसीलदार- डॉ मूणाल जाधव यांच्यासह हिमायतनगर, भोकर, तामसा सिंदखेड, किनवट, मांडवी व दंगा नियंत्रण पथक केंद्रीय राखीव दल व इतर पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणावर शिवणी या ठिकाणी उपस्थित आहेत. सदरील वृत्त लिहेपर्यत पोलीस विभागाची पुढील कारवाईचे चालू होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.