प्रतिष्ठा न्यूज

सांगली औद्योगिक वसाहतीतील सर्व रस्त्यांच्या रस्ते विकासाची वचनपूर्ती पूर्ण : आमदार सुधीरदादा गाडगीळ

प्रतिष्ठा न्यूज

सांगली १८ मार्च २०२४ :- सांगली विधानसभा क्षेत्रातील सांगली माधवनगर रोड वरील संपत चौक ते अहिल्यानगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे. ४ कोटी ४१ लाख रु. या कामाचा शुभारंभ तसेच प्रभाग क्र ११ मध्ये जिल्हा नियोजन समिती मधून मंजूर करण्यात आलेले महानगरपालिकेच्या निधी मधून सांगली माधवनगर रोड वरील वसंतदादा औद्योगिक वसाहत मधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे १ कोटी ६३ लाख या कामाचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते झाले. या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळित होण्यास सुलभता प्राप्त होईल. व याचा नागरिकांना फायदा होईल. तसेच या निधीमुळे औद्योगिक वसाहती मधील सर्व अंतर्गत रस्ते पूर्ण होणार आहेत.

याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष दीपक माने, अक्षय पाटील, औद्योगिक वसाहतचे चेअरमन सचिन पाटील, पोपट डोरले, माजी नगरसेवक विलास सर्जे, संताजी जाधव, तुकाराम चव्हाण, शरद पाटील, विजय भगत, रमेश नलवडे, गजानन निकम, शिवा लोखंडे, अरविंद सकट, अजय लोंढे, नितीन बेदमुथा, तुषार चव्हाण, संतोष जाधव, तसेच आदी मान्यवर व प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.