प्रतिष्ठा न्यूज

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नांदेड-हिंगोली जनसंवाद दौरा

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : – शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नांदेड व हिंगोली लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा होणार आहे. दि.18 मार्च 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता ठाकरे यांचे नांदेडात आगमन होणार नंतर ते वसमत जिल्हा हिंगोलीकडे रवाना होतील. दि.19 रोजी दुपारी 3:00 वाजता अर्धापुर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे होणाऱ्या मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
शहरातील हॉटेल विसावा येथे झालेल्या पत्रकार परिषदेस राज्य संघटक- एकनाथ पवार, जिल्हा संपर्क प्रमुख- दत्ता कोकाटे, जिल्हा प्रमुख- माधव पावडे, बंडू खेडकर, बबन बारसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पावडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक मतदार संघात दौरा करून शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री- उद्धव ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत आहेत. या अनुषंगाने हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन दिवसीय जनसंवाद दौरा होणार आहे. उद्धव ठाकरे हे मुंबईहून दि.18 रोजी निघणार असून सकाळी 9:30 वाजता विमानाने नांदेड विमानतळावर दाखल होतील. येथुन ते वसमत येथे आयोजित संवाद मेळाव्यास रवाना होतील. यानंतर दुपारी 3:00 वाजता. सेनगाव, सायंकाळी 6:00 वाजता कळमनुरी येथील मेळाव्यास उपस्थिती राहतील. यानंतर हिंगोली येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे. दुसऱ्या दिवशी दि.19 मार्च रोजी सकाळी हिंगोलीहून उमरखेड येथे सकाळी 11:30 वाजता संवाद मिळावा घेण्यात येणार
आहे. त्यानंतर उमरखेड येथुन हदगाव येथे त्यांचे आगमन होईल. येथे काही वेळ राखीव असून त्यानंतर दुपारी 2:00 वाजता अर्धापूर येथुन निघणार आहेत. दुपारी 3:00 वाजता पिंपळगाव महादेव येथे शिवसेना पक्षप्रमुख- उद्धव ठाकरे हे नांदेड जिल्हयाचा संवाद मेळावा घेणार आहेत. यांच्यासोबत खा.संजय राऊत, खा.विनायक राऊत, विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, संपर्क प्रमुख बबनराव थोरात  आदींची उपस्थिती राहणार आहे. यानंतर सायंकाळी 4:00 वाजता पिंपळगाव येथुन नांदेड विमानतळकडे रवाना होतील. सायंकाळी 4:45 वाजता. नदिड विमानतळावरून ते छत्रपती संभाजीनगरकडे प्रायाण करणार आहे, असे सांगीतले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा दौरा पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी उत्साह व स्फूर्तिदायक असणार आहे.असे ही जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी सांगीतले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.