प्रतिष्ठा न्यूज

पिंपळदरी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची हभप मधुसुदन महाराज यांच्या किर्तनाने सांगता

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथे दरवर्षी प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व नारायणदेव यात्रे निमित्ताने आज सप्ताहाची सांगता प्रसिद्ध किर्तनकार हरिभक्त परायण गुरुवर्य- मधुसूदन महाराज कापसीकर भक्ताश्रम हिंदोळा, यांचे किर्तनाने झाली. या भव्य किर्तन सोहळ्यास मृदंगाचार्य- केदार महाराज सुगावे व दामोदर महाराज रुईकर यांनी उत्तम साथ दिली, तर गायक म्हणुन- श्रीधर पांचाळ, रमेश पाटील, साईनाथ पाटील, सुभाष खैरगावकर, माऊली घागरदरे, मारोती जाधव, बालाजी जाधव, डॉ. तुकाराम दरेगावकर, यांनी मोलाचे सहकार्य केले. तर चोपदार म्हणुन-  माधव मामा अंचोलीकर, पळसगावकर, गोणारकर, यांनी आकर्षक नृत्य करत आपली भूमिका सादर केली. या सप्ताहास त्रिकुटेश्वर साउंड सिस्टीम कापसी- बु , संत बाळगीर महाराज टेन्ट व मंडप डेकोरेशन कापसी (गुंफा ) यांनी तत्पर सेवा दिली.
यावेळी या सप्ताहास कापशी बु / खु, हिंदोळा, करमाळा, डोलारा, वाळकी, जोमेगाव, धनज, उमरा, गोळेगाव, मारतळा, येथील भजनी मंडळ उपस्थित होते. या नंतर समस्त गावकरी मंडळीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.