प्रतिष्ठा न्यूज

‘परशुराम’ च्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड : पल्लवी नारकर हिची उत्तुंग झेप

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२३ : मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्तरावर विज्ञान प्रदर्शने घेतली जात आहेत.

गगनबावडा सारख्या ग्रामीण भागातील परशुराम विद्यामंदिर मधील मुलगी पल्लवी राजू नारकर या मुलीने ATAL assistant नावाचे ॲप्लिकेशन तयार केले आहे. या कल्पक विज्ञान अप्लिकेशन मुळे तिची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
नुकतेच तालुकास्तरावरील  विज्ञान प्रदर्शन सांगशी, तालुका गगनबावडा येथे झाले. यामध्ये तिच्या  ATAL Assistant या उपकरणाचा प्रथम क्रमांक येऊन या उपकरणाची जिल्हा स्तरावर निवड झाली. जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शन कसबा वाळवा, तालुका राधानगरी  याठिकाणी पार पडले. व या जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात या उपकरणाचा द्वितीय क्रमांक येऊन त्याची निवड राज्य स्तरावर झालेली आहे.
पल्लवी नारकर हिने तयार केलेले ATAL Assistant हे आधुनिक उपकरण आहे. भारतामध्ये प्रत्येक शाळेत अटल लॅब बनत आहे.
ATAL च्या लॅब मधून  शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळते.मात्र विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन होत नाही. म्हणून हे उपकरण आपण बनविल्याचे मत विद्यार्थिनी पल्लवी नारकर हिने व्यक्त केले आहे.
या अँप मधून विद्यार्थी आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकतात, तसेच या मध्ये आपण विविध प्रयोग, उपकरणाचे विडिओज पाहू शकतो व महत्वाची माहिती वाचू शकतो. सध्या हे aap प्ले स्टोअर वर उपलब्ध नाही. मात्र QR कोड स्कॅन करून हे aap आपण डाउनलोड करू शकतो.
गगनबावडा सारख्या एका दुर्गम शाळेतील विद्यार्थ्यांनीने तयार केलेल्या उपकरणाची निवड राज्य स्तरावर झाल्याने तालुक्यातून विद्यार्थीनी पल्लवी नारकर  परिसरातून कौतुक होत आहे. परशुराम विद्यालयाचे प्राचार्य रंगराव गोसावी व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

“पल्लवी अत्यंत अभ्यासू व प्रयोगशील वृत्तीची असून त्या ॲप्लिकेशन मधून विद्यार्थ्यांना अभ्यासात फायदा व्हावा, तसेच गगनबावडा तालुक्याचे नाव उंच व्हावे, असे तिचे ध्येय आहे.”

– राजू नारकर, (पल्लवी चे वडील ) गगनबावडा

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.