प्रतिष्ठा न्यूज

तेजेराव गोविंदराव पाटील सिरसाट यांचे निधन- शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील ज्येष्ठ नागरिक तेजेराव गोविंदराव पाटील सिरसाट वय-70 वर्षे यांचे दि.26 सप्टेंबर 2023 रोज मंगळवारी सकाळी- 5:30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिवावर दुपारी-3:30 वाजता उमरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कै.तेजेराव पाटील यांचे पश्चात- पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातु, असा परिवार आहे.ते सेवानिवृत्त अभियंता- दाजीराव पाटील सिरसाट यांचे बंधू, तर शशीकांत पाटील सिरसाट व धनंज खु. येथील विद्यमान सरपंच- सुनीताताई व्यंकटराव पाटील सावळे यांचे वडील होत.
त्यांच्या अंत्यविधीला- प्रवीण पाटील चिखलीकर, एस. व्ही.कल्याणकर, डॉ. मुंजाजीराव मोहिते, भुजंग पाटील डक, गणेश पाटील सावळे, डॉ. बालाप्रसाद धोंडगे, गणेशराव उबाळे, बालाजी पाटील बडूरकर, बालाजी पाटील सावळे, सुधाकर पाटील जाधव, कवळे पाटील, अच्युतराव पाटील, सुभाष गायकवाड, कृष्णा शिंदे (बातमीदार),सह यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित होते.
●प्रतिष्ठा न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली….💐🙏
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.