प्रतिष्ठा न्यूज

संभाजी ब्रिगेडच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या महत्वाच्या साहित्याचे वाटप

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सामाजिक जबाबदारी समजून कष्टकरी गोरगरीब यांच्या गरजू विद्यार्थ्यांना शिकत असताना आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप करणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. हीच मुली भविष्यात मोठी झाल्यानंतर देशाचे भवितव्य घडवणार आहेत. या पद्धतीने इथल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन भविष्यात अशाच प्रकारे शाळांना मदत करावी, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले.
मिरज विद्यानगर येथील विश्वदर्शन मराठी मुला मुलींची शाळा येथे संभाजी ब्रिगेड, उदयवार्ता न्यूज आणि साप्ताहिक आवाज सांगलीच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रसंगी युवराज शिंदे बोलत होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विद्युलता अनिल चव्हाण, उदयवार्ता न्यूजचे संपादक उदयसिंह राजपूत, साप्ताहिक आवाज सांगलीचे संपादक आणि संभाजी ब्रिगेड सोशल मीडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ श्रीकांत भोसले, संभाजी ब्रिगेडचे
उपजिल्हाध्यक्ष,शिवाजी जाधव,तालुका अध्यक्ष राजू जाधव, जिल्हा वाहतुक संघटनेचे अध्यक्ष संदीप पवार, सांगली शहराध्यक्ष नितीन पवार, पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनुराज होळकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ विद्युलता अनिल चव्हाण मॅडम व शिक्षक यांनी केले. गेल्या काही वर्षांपासून उदयवार्ता न्यूजचे मिरज तालुका प्रतिनिधी आणि साप्ताहिक आवाज सांगलीचे संपादक डॉ श्रीकांत भोसले यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थ्यांना मदत तसेच समाजातील उपेक्षित वंचित घटकांना शासनाच्या पेन्शन, रेशन आदी योजना सुरू करून देणे असे विविध उपक्रम राबवले जातात. त्याच पद्धतीने आज मिरज विद्यानगर येथील विश्वदर्शन मराठी मुला मुलींची शाळा या ठिकाणी संभाजी ब्रिगेड, उदयवार्ता न्यूज आणि साप्ताहिक आवाज सांगलीच्या वतीने सदर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेत शिकणारे जवळपास सर्वच विद्यार्थी हे गोरगरीब कष्टकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था सुसह्य होण्याच्या दृष्टीने आगामी काळात शाळेला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी संभाजी ब्रिगेड, उदयवार्ता न्यूज आणि साप्ताहिक आवाज सांगलीच्या वतीने डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक यांना दिली. या छोट्याशा मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहा महिन्यांचा तरी लाभ होणार असल्याचे यावेळी मुख्याध्यापिका सौ विद्युलता अनिल चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या छोट्याशा मदतीने शाळेतील विद्यार्थी भारावून गेले असल्याचे चित्र यावेळी बघावयास मिळत होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.