प्रतिष्ठा न्यूज

विनायक कदम यांना ‘वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण पत्रकार पुरस्कार’ जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
देवराष्ट्रे प्रतिनिधी : वृक्षमित्र धों. म. मोहीते पर्यावरण पत्रकार पुरस्कार (लोढे ता. तासगाव) येथील पर्यावरण कार्यकर्ते असलेले दैनिक जनप्रवासचे पत्रकार विनायक कदम यांना जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण पत्रकाराला उच्च स्तरावर खऱ्या अर्थाने दखल घेऊन प्रोत्साहन देण्यात आले आहे.
कडेगाव, खानापूर तालुक्यातील साहित्यिक व साहीत्यप्रेमीनी गेली बारा वर्षाहून अधिक काळ एकत्र येत ‘आपली शिदोरी आपलं संमेलन’ सागरेश्वर अभयारण्यात भरवत आहेत. यामध्ये या विभागातील जेष्ट साहित्यिक, पत्रकार, पर्यावरणप्रेमी, मानवनिर्मित अभयारण्याचे निर्माते आदरणीय धो. म. मोहीते यांना अभिवादन करणेसाठी त्यानीच निर्माण केलेल्या अभयारण्यात सप्टेबर महीन्यातील रविवारी एकत्र येवून साहीत्य संमेलन घेणेचे निश्चित केले. आदरणीय धो. म. आण्णाना अभिवादन करतच शिदोरी संमेलनात धों. म. मोहीते यांच्या नावे पर्यावरण पत्रकार पुरस्कार पर्यावरणावर काम करत असलेल्या पत्रकाराला देऊन त्याला सन्मानीत करण्यात येत असते.
या वर्षाचा हा पुरस्कार प्रसिद्धी परांगमुख असलेले तासगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विनायक कदम याची निवड समितीने निवड केली आहे. विनायक कदम गेली ९ वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता करत असून पर्यावरणाचे रक्षण करणेचे कार्य करत आहेत. प्रत्येक वर्षी स्वतः अनेक जातीच्या वृक्षांची नर्सरी तयार करुन लोकाना मोफत रोपे देतात. ते वृक्ष लावण्याला प्रवृत्त करतात. वृक्ष लावलेनंतर त्याची जोपासना करणेसाठी धडपडतात . मुलाच्या जन्मापासून, बारशापासून ते माणसाच्या निधना पर्यतंच्या वेळेला त्या त्या निमीत्ताने संबंधीतानी वृक्षांची लागवड करावी म्हणून धडपडत असतात.
नव्याने रस्ते बांधणीवेळी, रस्ता रुंदी करताना जुनी, दुर्मिळ, मोठे वृक्ष तोडले जावू नयेत म्हणून धडपडत असतात. त्या वृक्षाच्या पुर्नरोपनासाठी धडपडत असतात . स्वताः चे शेतात अनेक वृक्षाची लाग्वड केली आहे. ४० विविध जातीच्या झाडांची नर्सरी दरवर्षी तयार करतात. विविध पर्यटन स्थळ व त्यांची वैशिष्ट्ये यावर वृत्तपत्रातुन लिखाण करत असतात. ग्रामिण भागातील तळागाळातील दबलेल्या , पिचलेल्या व्यक्तीवर वृत्तपत्रातुन लेखन करतात व त्या व्यक्तीला मदत मिळवुन देतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन , आपली शिदोरी आपले संमेलनामध्ये वृक्षमित्र धों. म. मोहीते पुरस्कार पत्रकार विनायक कदम याना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी सागरेश्वर अभयारण्य येथे होणाऱ्या आपली शिदोरी आपले संमेलनात हा पुरस्कार सोहळा होणार आहे. विनायक कदम याना मानपत्र, महावस्त्र, पुष्पहार आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पत्रकार नंदु गुरव , पत्रकार उदय गायकवाड , पत्रकार प्रमोद चौगुले, प्रदिप सुतार समाधान पोरे पत्रकार विनोद कामतकर , पत्रकार शैलेंद्र पाटील, अभिजीत पाटील आदींना या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार समितीत आनंदराव पाटील ॲड. सुभाष पाटील, रघुराज मेटकरी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, एमबी जमादार, सदानंद माळी, सु. धो. मोहिते, यानी ही निवड केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.