प्रतिष्ठा न्यूज

‘१८ जुलै ‘ च्या राष्ट्रवादी च्या आंदोलनाला वाटण्याच्या अक्षता : तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : कोल्हापूर- गगनबावडा हा मार्ग हा खड्डेमय झाला असून सदरचा रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा या मागणीसाठी गगनबावडा राष्ट्रवादीच्या वतीने १८जुलै रोजी अर्धनग्न आंदोलन करत रस्ता रोको केला होता. त्यावेळी आठ दिवसांमध्ये रस्त्याचे काम पूर्ण होईल असे बांधकाम विभागाच्या जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते पण गेली पंधरा दिवस पूर्ण होत आले तरी अद्याप रस्त्यावर कुठल्या प्रकारचे काम चालू नसल्याने अखेर राष्ट्रवादी पक्षाला वाटाण्याची अक्षता लावल्या असे तालुक्यामध्ये बोलले जात आहे.


गगनबावडा- कोल्हापूर राज्य महामार्गावर असळज गावाजवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यात खड्डे पडले आहेत.
यामुळे रस्ता खड्ड्यात आहे की खड्डे रस्त्यात आहे हे वाहन चालकांना समजत नसल्याने तारेवरची कसरत करत वाहन चालवावी लागते.या खड्ड्यांमध्ये अनेक जण पडून आतापर्यंत जखमी झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर गगनबावडा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने असळज येते १८जुलै रोजी अर्धनग्न आंदोलन करत रस्ता रोको केला होता. त्यावेळी बांधकाम विभागाच्या कोल्हापूर जिल्हा उपअभियंता बारटक्के यांनी आठ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले होते. पण बारटक्के यांनी फक्त वेळ मारून नेली असून आम्हाला व आमच्या पक्षाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत असे मत राष्ट्रवादी पक्षाचे सामाजिक न्याय जिल्हा कार्याध्यक्ष जी एस कांबळे यांनी व्यक्त केले असून येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण नाही झाले तर मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.