प्रतिष्ठा न्यूज

मौजे जाकापुर येथे छ.संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : जाकापुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची 360 वी जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. येथील शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष नवनाथ पाटील शिरसे आणि गंगाधर जाधव यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ नागरिक श्री नागोराव शंकर पा.जाधव , विश्वनाथ बाबा पवार, श्री गणेश बाबा पवार, श्री माधव इरवंता पाटील जाधव,तसेच गंगाधर मारोती पाटील जाधव, निवृत्ती शिवराम पाटील शिरसे आदीजण उपस्थित होते.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय जाकापुर ता.कंधार येथे छत्रपती राजे संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच श्री गोपाळ पाटील जाधव आणि य़ंकटराव पाटील शिरसे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी यंकट नागोराव पा.शिरसे,श्री हणमंत पाटील शिरसे, आदिजण उपस्थित होते.


छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.