प्रतिष्ठा न्यूज

मराठवाडा पदवीधर शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार श्री सुर्यकांत विश्वासराव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; तिरंगी लढत होणार!

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
छत्रपती संभाजीनगर दि.14 : मराठवाडा पदवीधर मतदार संघ संभाजीनगर मधून मराठवाडा शिक्षक संघाचे तथा अपक्ष उमेदवार श्रीकांत विश्वासराव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार विक्रम काळे तर भाजपाचे प्रा.किरण पाटील आणि बिगर राजकीय संघटना तथा मराठवाडा शिक्षक संघाचे श्री सुर्यकांत विश्वासराव यांच्या मध्ये तिरंगी लढत होत आहे. मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार श्री सुर्यकांत विश्वासराव यांनी शिक्षकांच्या जुनी पेंशन चा प्रश्न असो की अघोषित शाळा,महाविद्यालयीन शिक्षक.शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अनुदान मिळवून देण्यासाठी रस्त्यावर आंदोलन केले आहे. शिक्षकाच्या खांद्याला खांदा देऊन ,आंदोलने मोर्चे,उपोषण करून शासनास न्याय मिळवून देण्यासाठी भाग पाडले आहे. त्यामुळे श्री विश्वासराव यांच्या वर शिक्षक मतदार बंधू भगिनींचा दिवसेंदिवस विश्वास वाढत आहे. त्यांनी आतापर्यंत मराठवाडयात शिक्षक ,प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनींची भेट घेतली आहे. त्यांची मतदारसंघात गाठी- भेटी घेण्याची एक फेरी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत शिक्षक सेनेने मतदारसंघात उमेदवार दिला नाही. त्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार श्री सुर्यकांत विश्वासराव यांना मराठवाडयातून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान मराठवाडा शिक्षक पदवीधर,विधानपरिषद निवडणूक लढत तिरंगी होणार आहे. भाजपाचे किरण पाटील यांना प्रशांत बंब यांच्या शिक्षक बंधू आणि भगिनींना अपशब्द बोलल्या त्या वक्तव्यामुळे वक्तव्यामुळे फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर विद्यमान आमदार श्री काळे यांच्या बद्दल शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.मात्र विरोधी पक्ष नेते श्री अजित दादा पवार हे पुढील निर्णय कोणता घेतील यावर सगळ्या प्रचार यंत्र कशी राबवतील यावर यावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. मात्र सध्या तरी अपक्ष उमेदवार श्री सूर्यकांत विश्वासराव यांनी प्रचारात आघाडीवर आघाडीवर आहेत .त्यांनी मराठवाड्यातील सर्वच शिक्षकांशी गाठी भेटी संपर्क वाढण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिला आहे . या निवडणुकीसाठी दि.30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकडे आता मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.