प्रतिष्ठा न्यूज

बेंद्री जलदेवता विकास सोसायटीच्या चेअरमनपदी विजयकुमार पाटील व व्हा चेअरमनपदी यशवंत गुरव यांची निवड..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:बेंद्री तालुका तासगाव येथील जलदेवता विकास सोसायटीच्या चेअरमनपदी विजयकुमार प्रकाश पाटील यांची व व्हा.चेअरमन पदी यशवंत किसन गुरव यांची निवड झाली आहे.संस्थेचे चेअरमन तानाजी मारुती पाटील व व्हा चेअरमन विजयकुमार आनंदराव मदने यांच्या राजीनाम्यानंतर निवड प्रक्रिया  बिनविरोध शांततेत पार पडली. यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे श्री अशोक चव्हाण यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.मार्केट कमिटीचे माजी उपसभापती दिनकर आप्पा पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक तानाजी मारुती पाटील,मनोहर आकाराम पाटील,विजय आनंदराव मदने,अनिल विठ्ठल पाटील,दादासो आत्माराम पाटील,आनंदराव शिवाजी शिंदे,विलास यशवंत जाधव,महेश जनार्धन पाटील,बापूसो बिडू कांबळे,सौ इंदुमती गोविंद पाटील,सौ  रंजना बबन पाटील यांच्या उपस्थितीत संस्थेचे सचिव विठ्ठल कुंभार यांच्यासह चंद्रकांत पाटील, सुरेश पाटील,चंद्रकांत शिंदे,उमेश पाटील, विकास पाटील,शिवाजी पाटील,उमेश गायकवाड,राजेश मुलानी, सचिन जाधव,नागेश गुरव यांच्यासह अन्य सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.