प्रतिष्ठा न्यूज

कर्मवीर पतसंस्था दोन हजार कोटी ठेवींचा टप्पा पुर्ण करेल : चेअरमन रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला विश्वास; १०१० कोटी ठेवी पुर्ततेबद्दल सभासदांचा आभार मेळावा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सभासदांनी ठेवरुपाने अपेक्षेपेक्षा आम्हाला मोठा आशिर्वाद दिला आहे. याहुन आम्ही सभासदांच्याकडे आणखी काय मागणार? न मागता ठेवीदारांनी संस्थेची झोळी भरुन वाहील इतक्या ठेवी संस्थेमध्ये ठेवल्या आहेत. खरोखरच आमच्या आनंदाला सिमा राहिली नाही. सभासदांनी आम्हाला दिलेला विश्वासाचा मोठा ठेवा आहे. या विश्वासाच्या बळावर कर्मवीर पतससंस्थेचा नावलौकीक साऱ्या महाराष्ट्रात पोहचविण्यासाठी आम्ही कटीबध्द झालो आहोत. येत्या तीन वर्षात संस्थेच्या ठेवी रु.२००० कोटीच्या वर नेवू तसेच संस्थेच्या शाखांच्या शृखंला १०० पर्यंत नेमू असा ठाम विश्वास संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगाँडा पाटील यांनी व्यक्त केला. संस्थेने रु.१०१० कोटी ठेवीचा टप्पा पुर्ण केल्यानिमित्त आयोजित सभासद ठेवीदार, हितचिंतक यांच्या कृतज्ञता सोहळयामध्ये ते बोलत होते.

दैवज्ञ भवन, सांगली येथे आयोजित या सोहळयास मोठ्या संस्थेने सभासद, मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अनेक वेळा सभासभासदांनी अक्षरशः उभे राहून चेअरमन संचालक, ठेवीदार, कर्जदार सेवक यांनी उभे केलेल्या अविश्वसनीय कार्याचे टाळ्या वाजवून कौतुक केले. हह्या कार्याचे कौतुक करताना उपस्थित सभासद, हितचिंतक यांच्या आनंदाला अगदी उधान आल्याचे चित्र कृतज्ञता सोहळयाच्या ठिकाणी अनुभवायला मिळाले.

सभासदांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना श्री. रावसाहेब पाटील यांना देखील सद्दीत झाले होते. त्यांनी संस्थेला सर्वच बाबतीत नंबर १ ला नेमून ठेवण्याचा विश्वास सभासदांना दिला. उपस्थितांनी अनेक वेळा संपूर्ण सभागृह टाळयांच्या गजरांनी दणाणून सोडले. रावसाहेब पाटील यांच्या प्रत्येक वाक्यागणिक सभासदांनी टाळया वाजवून श्री. रावसाहेब पाटील यांच्या नियोजनाचे आणि कल्पनांचे स्वागत केले.

यावेळी नवनियुक्त सल्लागार मंडळ शाखा कॉलेज कॉर्नर श्री अविनाश सुरेश पाटील, श्री. प्रशांत सुकुमार अवधूत. श्री. राजू एस. पाटील, श्री. विजयसिंह जयवंतराव चव्हाण, श्री. सुर्यकांत मानसिंगराव पाटील, श्री. शिवाजी रामचंद्र डांगे, शाखा गर्व्हमेंट कॉलनी: श्री. अनिल धोंडीराम बिरनाळे, श्री. शरदचंद्र आण्णासाहेब पाटील, श्री. सुरेश शांतीनाथ वसगडे श्री. बाळासाहेब आण्णासाहेब चव्हाण, श्री. कुमार गबरु बेले. श्री. प्रफुल्ल प्रकाश पाटील शाखा पुष्पराज चौक : प्रा एन डी बिरनाळे श्री. विनोद विठ्ठलराव पाटोळे, श्री. सतिश सारडा, श्री. प्रमोद शेटे. शाखा विजयनगर : डॉ विष्णूपंत नारायण ढोबळे (यादव) डॉ. रणजीत पाटील डॉ. प्रशांत सदाशिव महिंद, डॉ. स्वप्निल रामचंद्र चोपडे, प्रा. माणिक हंबीरराव पाटील, श्री. जयपाल दत्तु चिंचवाडे, श्री. अशोक मारुती बाबर शाखा लक्ष्मीनगर :- ॲड. मदन आदगोंडा पाटील, श्री. मिलिंद वसंतराव चौधरी या नवनियुक्त शाखा सल्लागारांचा सत्कार संचालक मंडळाच्या हस्ते संपन्न झाला.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांनी सभासदांचे ऋण व्यक्त करणे ही आमची जबाबदारी होती पण यामुळे सभासद ठेवीच्या रुपाने पुन्हा भरभरुन आशिर्वाद आम्हाला देतील असे भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमात श्री. विजयसिंह जयवंतराव चव्हाण, सत्यविजय बँकेचे सीईओ श्री. भरत नाईक, श्री. विनोद पाटोळे. सीए सुदर्शन कदम, प्रा. एम एस रजपूत यांनी संस्थेने अविश्वसनीय कामगिरी केल्याचे सांगुन संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचा भाग म्हणुन दुपारी ३.०० वाजता भावे नाट्यमंदीर सांगली येथील भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा भुपाळी ते भैरवी हा संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम देखील अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे देखील सभासद व प्रेक्षकांनी तोड भरुन कौतुक केले.
या दिवसभराच्या दोन्ही कार्यक्रमास व शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संस्थेने हजेरी लावली.

यावेळी संस्थेचे संचालक ॲड. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ओ.के. चौगुले (नाना), श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले. डॉ. एस.बी. पाटील (मोटके), डॉ. चेतन पाटील, संचालिका श्रीमती भारती चोपडे, सौ. चंदन केटकाळे तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे. श्री. लालासो ‘भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांच्यासह संस्थेचे सेवक उपस्थित होते, आभार व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी मानले सुत्रसंचलन श्री. संजय सासणे यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.