प्रतिष्ठा न्यूज

देगाव येथे आमदार बालाजी कल्याणकर लग्न समारंभासाठी गेले असता यांच्या गाडीच्या काचा फोडल्या

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : – अर्धापूर तालुक्यातील देगाव (कुऱ्हाडा ) येथे नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या गाडीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे.
दि.17 मार्च 2024 रोजी आ.बालाजी कल्याणकर हे देगाव (कु) येथे एका लग्न समारंभासाठी  गेले होते. तेव्हा तेथे काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याने गाडीच्या मागील काचा फोडल्या.
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरे यांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठा समाजही ठाम आहे. तर शासनानकडून कुठलाच निर्णय होत नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. रविवारी मराठा आंदोलनकांनी शिवसेना शिंदे गटाचे आ. बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली. आ.कल्याणकर हे एका लग्न समारंभासाठी देगाव येथे गेले होते, तिथे मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत होते. त्यामुळे या वाहणाची तोडफोड मराठा तरुणांनी केली असावी असे बोलले जात आहे.
या घटनेमुळे तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले मात्र नेमकं हे कृत्य कुणी केलं हे अद्याप समोर आले नाही.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.