प्रतिष्ठा न्यूज

प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत जिल्हा सोशल मीडिया कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : प्रदेश अध्यक्षांच्या संघटनात्मक कार्यक्रमात सोशल मीडियाची महत्त्वपूर्ण बैठक नियोजित होती. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व मंडल स्तरावरील, तसेच युवा मोर्चा, महिला आघाडी, ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाती जमाती मोर्चा व सोशल मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बावनकुळे यांनी येत्या काही दिवसात जिल्हास्तरावर 500 सोशल मीडिया कार्यकर्त्यांचा गट तयार करून त्यांना रीतसर प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले तसेच या सर्व कार्यकर्त्यांना पक्षाच्यावतीने ओळखपत्रे दिली जातील आणि या सर्व कार्यकर्त्यांनी कोणत्याही दबावाला न बळी पडता आपले काम निर्भीडपणे करावे असे आवाहन केले या सर्व कार्यकर्त्यांच्या मागे पक्ष ठामपणे उभा आहे असे त्यांनी सांगितले याच वेळी प्रदेश स्तरावर फ्रेंड्स ऑफ बीजेपी म्हणजे जे भाजपचे पदाधिकारी नाहीत परंतु भाजपच्या विचाराने सोशल मीडियावर व्यक्त होत असतात अशा लोकांचा गट तयार करण्याच्या नव्या संकल्पनेचा प्रारंभ याच बैठकीत सांगलीतूनच करण्यात आला त्यावेळी फ्रेंड्स ऑफ बीजेपी चे संयोजक श्री सतीश निकम व श्री आशिष पावसकर हे उपस्थित होते प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत 18 फ्रेंड्स ऑफ वॉरियर कार्यकर्त्यांना ओळखपत्राचे वाटप त्यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख व सरचिटणीस श्री केदार खाडीलकर यांनी केले यावेळी सोशल मीडिया व आयटी सेल संयोजक श्री शुभम कुलकर्णी सोशल मीडिया प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री संकेत कुलकर्णी सोशल मीडिया सांगली जिल्हा ग्रामीण संयोजक श्री शहरुख शिकलगार अनुसूचित जाती मोर्चा सोशल मीडिया संयोजक श्री नाना कांबळे प्रकाश कांबळे महिला आघाडी सोशल मीडिया संयोजक सौ माधुरी वसगडेकर,नीलेश निकम सतीश खंडागळे, उदय मुळे तुकाराम कोळी , सुमित कुलकर्णी , स्वप्निल शहा व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष श्री दीपक बाबा शिंदे सौ नीताताई केळकर प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री शेखर इनामदार हे यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.