प्रतिष्ठा न्यूज

१२३ मुलांना दिली मायेची उब : गगनबावडा पोलिस कर्मचाऱ्यांचा उपक्रम

प्रतिष्ठा न्यूज तुकाराम पडवळ
गगनबावडा ता.१४ :हुडहुडी भरायला लावणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी गगनबावडा पोलिसांचा आणखी एक उपक्रम.
गगनबावडा तालुक्यातील अनेक शाळांमध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून ‘सक्षम शाळा सदृढ शाळा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे . प्रत्येक शाळांमधून सुजाण नागरिक घडतात. गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
गगनबावडा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात बोरबेट येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत दि .१३ रोजी सक्षम शाळा सदृढ शाळा या कार्यक्रमाअंतर्गत ” टूगेदर वुई कॅन क्लब कोल्हापूर ” यांच्या मदतीने व गगनबावडा पोलिस कर्मचारी यांच्या सहकार्याने बोरबेट येथील आश्रम शाळेतील १२३ विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ , शिक्षक वृंद , पोलिस कर्मचारी हजर होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.