प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती दि.18 डिसेंबर पासून बंद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : ग्रामपंचायतीचे सरपंच , सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांच्या विविध मागण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषद, ग्रामसेवक युनियन,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य,महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत व जिल्हापरिषद कामगार संघटना,महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना,महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्या वतीने आज दि.16.12.2023 रोजी मार्केट कमिटी सभागृहात सर्व संघटनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली व सर्वानुमते राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे ठरले.

सोमवार दि.18.12.2023 ते 20.12.2023 पर्यंत सांगली जिल्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संपूर्ण कामकाज बंद ठेऊन दि.18.12.2023 व दि.19.12.2023 रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल व दि.20.12.2023 रोजी जिल्हा परिषद सांगली येथील कार्यालयासमोर सर्व संघटनेच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असे ठरले
या बैठकीला सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदिप माने पाटील, जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग, जिल्हा सरचिटणीस रमेश साबळे, महीला जिल्हा उपाध्यक्ष सविता तोरवे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, युनियनचे जत तालुकाध्यक्ष आगतराव काळे,बी .आर खाडे, खरमाटे, ग्रामसेवक युनियन चे प्रविण देसाई,ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे संदिप पाटील , स्वाभिमानी कर्मचारी संघटनेचे निवास जाधव, पलुस तालुकाध्यक्ष विजय अरबूने, कवठे महांकाळ अध्यक्ष अरुण भोसले, संजय चव्हाण, तासगाव तालुकाध्यक्ष विकास डावरे, वसुधा हिंगमिरे, संध्या मंडले, संगीता लेंगरे, उज्ज्वला गुंडे, अनिल पाटील, संजय चव्हाण यांच्या सोबत तालुका व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.