प्रतिष्ठा न्यूज

तासगावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य मिरवणूक

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्यावतीने ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन (तिथीनुसार) गुरुवारी शिवतीर्थ वर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त शहरातून फटाक्यांच्या आतीषबाजीत ध्वजपथक,शस्त्र पथक,ज्वाला पथकांसह काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी शिवप्रतिष्ठानचें धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने गेल्या काही दिवसापासून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरे करण्याचे नियोजन सुरू होते. शिवतीर्थ येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळयास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
गुरुवारी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.पुढे भगवा ध्वज मागे शस्त्रपथक,ज्वालापथक, ध्वजपथक व त्यामागे सजवलेल्या वाहनात छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती असे नेटके नियोजन या मिरणुकीचे करण्यात आले होते.शिवतीर्थ येथून छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय,छत्रपती श्री संभाजी महाराज की जय,भारत माता की जय,हिंदू धर्म की जय,हिंदू राष्ट्र की जय अशा घोषणाबाजीत या भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली.
शहरातील गुरुवार पेठ,गणपती मंदिर चौक,मुख्य पोस्ट ऑफिस,सिध्देश्वर चौक,वंदेमातरम चौक,बागणे चौक, स्टॅन्ड चौक व परत शिवतीर्थ येथे येऊन ध्येयमंत्र होऊन या मिरवणुकीची सांगता झाली.भाजपा तासगांव- कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकर पाटील यांनी भेट देत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे मूर्तीचे दर्शन घेतले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.