प्रतिष्ठा न्यूज

विसापूर येथील जिल्हा परिषद शाळा नं. 2 च्या विद्यार्थीनीला कॅनरा बॅंकेकडून मदत

प्रतिष्ठा न्यूज
विसापूर प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा नं. 2 विसापूर ता. तासगाव येथे कॅनरा बॅंकेकडून विद्यार्थ्यांना दोन हजार पाचशे रूपयांची मदत धनादेश देऊन करण्यात आली.
कॅनरा बॅंकेचे मॅनेजर श्री. प्रदीप थोरात यांनी इयत्ता पाचवी ते सातवी मधील अ. जा. संवर्गातील गुणवंत विद्यार्थिनींना ₹ 2500/-चा धनादेश आणि प्रमाणपत्र बहाल केले.
सांगली महापालिका सहाय्यक लेखाधिकारी अरुण माळी यांनी यासाठी प्रयत्न केले.
या कार्यक्रमासाठी सरपंच श्री. अशोक मोहिते, वस्तू व सेवा कर निरीक्षक वैभव माने, अध्यक्ष सुर्यकांत पाटील, उपाध्यक्षा सौ. उर्मिला माळी, सदस्य अशोक माळी, संतोष माने, सदस्या सौ. स्नेहल राजोपाध्ये, सर्व शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.