सुचित्रा पडवळ यांचा सत्कार
प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : सांगशी येथील सुचित्रा प्रवीण पडवळ यांची नुकतीच गगनबावडा तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली. यानिमित्ताने प्रेरणा महिला बहुउद्देशीय सेवा संस्था, सांगशी, तसेच जागृती महिला ग्रामसंघ, सांगशी च्या महिलांनी शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. बाबुराव पडवळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वर्षा पडवळ, नीता पडवळ, नीलम पडवळ, मंगल कांबळे, बेबी शिंदे, प्रवीण पडवळ,अशोक पडवळ, तुकाराम पडवळ हजर होते.