प्रतिष्ठा न्यूज

दुष्काळी मदत व पिक विमा वाटप करा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयाला कुलूप ठोकणार

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत व पिक विमा त्वरित 30 नोव्हेंबर पर्यंत वाटप करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देऊन तेथील कार्यालयाच्या समोर तीव्र निदर्शने करण्यात आली याबाबत अधिक ृत वृत्त असे की देगलूर तालुक्यातील गेल्या जीवन जुलै सप्टेंबर महिन्यात झालेल्या ढगफुटी सदस्य अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात खरीप हंगामातील सोयाबीन तूर मोग उडीद कापूस आदी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन चार महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे शासनाने अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही दसरा, दिवाळी सण सुद्धा होऊन बराच कालावधी उलटून गेला आहे अद्यापही शेतकऱ्याला दुष्काळी मदत व 25 टक्के अग्रीम रक्कम वाटप न झाल्यामुळे शेतकरी बांधवांना शारीरिक मानसिक आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. अनुदान वाटप करण्यात आले नसल्याने शेतकरी वर्गात असंतोष पसरला आहे .त्यामुळे त्वरित दुष्काळी मदत पिक विमा वाटप करण्यात यावे अन्यथा तहसील कार्यालयास व पिक विमा कार्यालयास कुलूप लावून आमरण उपोषणाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी तहसीलदार कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आले व तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर शिवसेना मतदारसंघ समन्वयक नागनाथ वाडेकर शहर प्रमुख बालाजी मैलागिरे , युवा सेना तालुका समन्वयक तथा शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख भागवत पाटील सोमुरकर उपशहर प्रमुख बाबुराव मिनकिकर युवा सेना तालुका समन्वयक सोशल मीडिया तालुकाप्रमुख रवी उल्लेवार युवा सेना शहरप्रमुख संजय जोशी, शिवसेना उपशहर प्रमुख बाबुराव मिनकीकर आदीसहसंख्य पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.