प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 11 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पोलीस अधिक्षक संदीप घुगे आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या उपस्थितीत एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीस कृषी, अन्न व औषध प्रशासन, महानगरपालिका, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू असून या कालावधीत गांजाची लागवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी महसूल व कृषी विभागाने याबाबत पाहणी करावी. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ‍विविध विभागाने घेतलेल्या कार्यक्रमाचे अहवाल संबंधित विभागाने सादर करावेत. जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याची खात्री आणि शेड्युल ड्रग्ज रजिस्टर ठेवले असल्याची खात्री अन्न व औषध प्रशासन विभागाने करावी. ड्रग डिटेक्शन किट आणि महापालिका क्षेत्रातील डार्क स्पॉट ठिकाणी एलईडी लाईट बसविणेबाबतही बैठकीत सूचना देण्यात आल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.