प्रतिष्ठा न्यूज

चिटमोगारा परिसरात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस वीज अंगावर पडून एका महिलेचा जागीच मृत्यू

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथील शेत मजूर महिला हुलूबाई लक्ष्मण काळेकर वय 50 वर्ष यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी साडेचार वाजता चिटमोगरा शिवारात घडली.
चिटमोगारा परिसरात अचानक ढग फुटी होऊन व विजांचा कडकडा सह जोराचा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने येथील शेतात शेतमजूर म्हणून काम करीत असलेल्या हुलूबाई लक्ष्मण काळेकर ह्या गवताचा भारा डोक्यावर घेऊन घराकडे निघाल्या असता सायंकाळी 4:30 वाजता गावाजवळ असलेल्या खंडोबा मंदिर बाजूस विज कोसळल्याने हुलूबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
सदरील घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरणिय तपासणीसाठी नायगाव च्या ग्रामीण रूग्णालयात पाठविले आहे.
मयत हुलूबाई लक्ष्मण काळेकर ह्या अत्यंत प्रेमळ मयाळू स्वभावाच्या व खुप मेहनती होत्या, त्यामुळे चिटमोगरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . यांच्या पष्चात पत्ती, दोन मुले, तिन मुली असा मोठा परिवार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.