प्रतिष्ठा न्यूज

बळीराजा पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बाळासाहेब रास्ते

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : बळीराजा पार्टीच्या महाराष्ट्र, प्रदेश अध्यक्षपदी बाळासाहेब रास्ते यांची निवड केल्याची घोषणा बळीराजा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्रसिंग धावडे यांनी आज यवतमाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मध्ये जाहीर केले.बळीराजा पार्टीच्या शेतकरी आत्महात्ये बाबत पक्षाच्यावतीने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आसल्याची घोषणा त्यांनी केली आहे.यावेळी नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांनी पक्षाच्या वतीने शेतकरी,शेतमजुर,महीला,विद्यार्थी यांच्या साठी महाराष्ट्र भर दौरे करुन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी मानव मंदीर येथे जाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले यावेळी उस्मानाबाद, जिल्हाअध्यक्ष, महादेव कांबळे, दिनेश पाटिल, उतमराव टाकरस, अंकुशराव रास्ते शेतकरी संघटना समन्वय समिती कार्याध्यक्ष धनंजय काकडे पाटील इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.