प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पीडीव्हीपी महाविद्यालयातील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव पीडीव्हीपी महाविद्यालय इमारतीवरून बुधवारी बारावी कॉमर्स मधील विद्यार्थिनीने उडी मारली होती. अकरावी आर्ट्स मध्ये शिकणाऱ्या आपल्या मैत्रिणीचे दप्तर आणण्यासाठी वर्गात गेल्यानंतर शिक्षिका एस डी पाटील यांनी संबंधित उडी मारलेल्या विद्यार्थिनीला अपमानित केल्याचा राग मनात धरून त्या विध्यार्थीनिने महाविद्यालयाच्या इमारती वरून उडी मारली होती. याप्रकरणी संबधीत विध्यार्थीनी आणि शिक्षक या दोघींचे जबाब पोलिसांनी घेतले होते. त्यावेळी पालक आणि मनसे नेते अमोल काळे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन महाविद्यालयात जाऊन जाब विचारला होता व एस डी पाटील या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विद्यार्थीनिने तासगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. तर भा. द.वी.स कलम 504, 506 बालकल्याण कायदा 2015 चें कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी मॅडम पाटील यांनी फिर्यादी मुलीस मूर्ख मुलगी असे म्हणून वर्गाच्या बाहेर हो, एकदा सांगितलेलं कळत नाही का, थोबाडीत देईन असे म्हंटल्याने वर्गातील मुले हसली त्यामुळे मला वाईट वाटल्याने मी इमारतीवरून उडी मारल्याचे संबधीत विद्यार्थी नीने फिर्यादीत म्हंटले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.