प्रतिष्ठा न्यूज

डॉ. प्रिती राऊत यांनी जिंकला मिसेस इंडिया मेडिको फिनॉमेनल 2023 चा किताब

प्रतिष्ठा न्यूज
नागपूर प्रतिनिधी : महिला डॉक्टर राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतातून 30 महिला डॉक्टर सहभागी झाल्या होत्या.
यात नागपूर येथील डॉ. प्रिती राऊत या मिसेस इंडिया मेडिको दिवा फेनॉमिनल २०२३ च्या मानकरी ठरल्या. हा किताब स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वार्तिका पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
डॉ. प्रिती राऊत, या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात कार्यरत असून, गेल्या 10 वर्षात त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले आहे. याव्यतिरिक्त सामाजिक कार्य भावनेतून माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, राजमाता जिजाऊ या भूमिका एकपात्री नाटकातून साकारलेल्या आहेत.
डॉक्टरांसाठी झालेल्या स्पर्धेत डॉ. प्रिती राऊत यांच्यासह अन्य 30 महिला डॉक्टरही सहभागी झाल्या होत्या. डॉ. प्रिती राऊत यांना मिस अँड मिसेस इंडिया मेडिको दिवा फेनॉमिनल आयकॉनचा किताब देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.